Home » तुमचे पाठबळ हीच माझी ऊर्जा – आ. नरेंद्र भोंडेकर

तुमचे पाठबळ हीच माझी ऊर्जा – आ. नरेंद्र भोंडेकर

35 हजार लोकांच्या साक्षीने भरला भोंडेकरांनी उमेदवारी अर्ज

by Maha News 7
0 comment
MLA Narendra Bhondekar

भंडारा :- तुमचा विश्वास आणि पाठबळ हीच माझी काम करण्याची ऊर्जा आहे. याच जोरावर मी मतदार संघाच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करू शकलो. आपल्या सर्वांच्या आशीर्वाद पुन्हा पाठीशी असू द्या, विकास गंगेचा प्रवाह असाच येत राहील, अशा शब्दात आमदार नरेंद्र भोंडेकर (MLA Narendra Bhondekar) यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आयोजित सभेत मतदारांना आश्वासित केले. जवळपास 35 हजार लोकांच्या जनसमुदायाच्या साक्षीने आमदार भोंडेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. भंडारा विधानसभेसाठी महायुतीचे उमेदवार म्हणून नरेंद्र भोंडेकर यांना शिवसेनेच्या वतीने उमेदवारी देण्यात आली आहे.  उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नरेंद्र भोंडेकर यांनी हजारो लाडक्या बहिणी आणि पुरुषांच्या साक्षीने आणि आशीर्वादाने आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी आम. भोंडेकर यांच्या पत्नी डॉ अश्विनी भोंडेकर उपस्थित होत्या, त्यापूर्वी येथील किसनलाल सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित समुदायाला संबोधित करताना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी देत दाखविलेल्या विश्वासाबद्दल मतदारांचे आभार मानले आणि गेल्या पांच वर्षात केलेले विकास कार्य ही अविरत सुरू ठेवून भंडाऱ्याला सर्वांच्या स्वाभिमानचा बनवायचा असल्याची ग्वाही दिली.

ही बातमी पण वाचा : माजी आमदार राजू तिमांडे व सुधीर कोठारी यांनी अपक्ष नामांकन अर्ज दाखल

गेल्या पंच्याहत्तर वर्षात भंडाऱ्याचा विकास झाला नाही याची लाज वाटायची परंतु आता जल पर्यटन सारखे प्रकल्प भंडाऱ्याला जागतिक पातळीवर ओळख  मिळवून देणार आहे. असे एक नाही तर तब्बल 33 प्रकल्प जिल्ह्यात राबविल्या जात आहे जय मुळे जिल्ह्यातील 10 हजार पेक्षा आधिल लोकांना रोजगारची संधि उपलब्ध होऊ शकेल. जे फक्त महायुती सरकार आणि शिंदे साहेबांच्या सहकार्याने होऊ शकले आहे. महायुतीच्या शासन काळात भंडारा विधानसभा मतदारसंघाचा सर्वार्थाने विकास साधण्याचा प्रयत्न केला. सभेला शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल गायधने, उपजिल्हा प्रमुख सुरेश धुर्वे, लोकसभा समन्वयक संजय कुंभलकर, युवा सेना लोकसभा प्रमुख जॅकी रावलानी, उपजिल्हा प्रमुख विजय काटेखाए, महिला जिल्हा संगठक सविता तुरकर, माजी महिला संगठक आशा गायधने, प्रकाश मालगावे, परमात्मा एक सेवक मंडळाचे वैरागडे गुरुजी, योगेश तुरकर, मोरेश्वरजी सार्वे, तेली समाज कमेटी चे अध्यक्ष बाबूजी सेलोकर, व समस्त पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.सभेनंतर अर्ज सादर कारण्या करीता भव्य पदयात्रा काढण्यात आली ज्यात जवळपास 35 हजाचा जन समुदाय सामील झाला. ही पदयात्रा शास्त्री चौक, गांधी चौक, पोस्ट ऑफिस चौक आणि मुस्लिम लायब्ररी चौक या मार्गाने विशाल अशी रॅली काढण्यात आली. या मार्गावरून जात असतांना प्रत्तेक चौकात आम.  नरेंद्र भोंडेकर यांचे पुष्पवर्षा ने अभिनंदन केला. हातात भगवे झेंडे आणि नरेंद्र भोंडेकर यांच्या समर्थनार्थ असलेले फलक घेऊन सहभागी झालेल्या नागरिकांचा उत्साह पाहता महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

  • रिपोर्टर: क्रिष्णा बावनकुळे भंडारा महाराष्ट्र

You may also like