Home » अल्ट्राटेक सिमेंट कंपनीतील कामगारांचे कामबंद आंदोलन

अल्ट्राटेक सिमेंट कंपनीतील कामगारांचे कामबंद आंदोलन

कामगारांना कंपनीमार्फत कसल्याही सुविधा नाहीत

by Maha News 7
0 comment
Mouda Worker Strike
  • कंपनी प्रशासनामार्फत कामगारावर दबाव तंत्राचा वापर
  • दोन कामगारांना केली मारहाण
  • पगार वाढीसाठी आणि आवश्यक सुविधेसाठी कामगारांचे आंदोलन
  • आंदोलन स्थळी राजकीय नेत्यांच्या भेटी

मौदा :- कामगारांची पगारवाढ न करणे, कामगारांची युनियन होऊ न देणे, पगार वाढीबाबत कुणी कामगार बोलल्यास त्याला कामावरून काढून घेणे, ठेकेदारांचा मनमानी कारभार तसेच दोन कामगारांना कंपनीच्या गेटवर मारहाण करून नियमबाह्य पद्धतीने कामावरून काढून टाकणे याविरोधात अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या कामगारांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे.

मौदा तालुक्यातील नवेगाव, आष्टी आणि तारसा स्थित असलेली अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचा (Ultratech Cement Company) कामगाराच्या विरोधात असलेला गलथान कारभार मागील नऊ वर्षापासून सुरु आहे. नऊ वर्षाच्या काळात केवळ एकदाच तीस रुपयाची पगारवाढ करण्यात आली आहे. येथील कंपनीत परिसरातील कामगार कामावर आहेत. कामगारांना आवश्यक असलेल्या सोयीसुविधा कंपनी मार्फत अध्याप पुरविल्या गेल्या नाहीत. त्याचप्रमाणे कंपनीतून निघणाऱ्या डस्टमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पगारवाढ आणि काही मागण्या याबाबत कामगारामार्फत कंपनी प्रशासनाला बरेचदा पत्र देण्यात आले पण त्यावर कसलेही उत्तर न देता वेळकाढू धोरण अवलंबविले त्यामुळे कामगारांचा रोष कंपनी विरोधात उफाळला आहे. अल्ट्राटेक कंपनीतील कामगारांनी कंपनी प्रशासनाला रीतसर पत्र देत आंदोलनाची भूमिका घेतली आहे. आंदोलनस्थळी रामटेकचे खासदार बबलू बर्वे, आमदार आशिष जयस्वाल, माजी मंत्री राजेंद्र मुळक, पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे आदीसह नेत्यांनी भेटी देत कामगारांच्या मागण्या बाबत प्रशासनाशी चर्चा करण्याची हमी दिली.

  • संदीप गौरखेडे, मौदा जि. नागपूर

You may also like