Home » वर्धा जिल्ह्यातील अल्लीपुर ते शिरुड रोडचे काम सुरू

वर्धा जिल्ह्यातील अल्लीपुर ते शिरुड रोडचे काम सुरू

खड्ड्यांमुळे कमरेच्या आजारात वाढ ; नागरिक बांधव होते त्रस्त

by Maha News 7
0 comment
Allipur to Shirud road work started

वर्धा :  वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात सर्वात मोठे गाव अल्लीपूर आहे. अल्लीपूर परिसरातील आजूबाजूचे सर्व गावातील नागरिक बांधव शेतकरी महिला विद्यार्थी तहसीलच्या कामाकरता रोज हिंगणघाट येथे प्रवास करीत असतात शेतकरी बांधव शेतकरी बांधव व्यापारी बांधव व विद्यार्थी रोज याच मार्गाने प्रवास करतात मात्र अल्लीपुरते शीरूड लहान वणीपर्यंत रोडला संपूर्ण एक ते दोन फुटापर्यंत खोल खड्डे पडले आहेत. मात्र याकडे लोकप्रतिनिधींचे अनेक वर्षापासून दुर्लक्ष होते .

लहान वणी ते अल्लीपूर स्टेट हायवे रोड दोन टप्प्यांमध्ये होणार आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम हिंगनघाट उपअभियंता प्रशांत धमाणे यांनी दिली आहे .

आमदार रंजीत कांबळे यांनी शासनाकडे सातत्याने प्रयत्न केले त्यामुळे अल्लीपुरते शिरूड या मार्गाचे काम सुरू झाले आहे अल्लीपूर ते शिरूड हा मार्ग दुरुस्त झाला नोव्हता त्यामुळे नागरिक बांधवांना खूप त्रास सहन करावा लागत होता. या रोड साठी कित्येकदा गावातील नागरिक बांधवांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी निवेदने सुद्धा दिली मात्र फक्त रोडची डाग डूगी केल्या गेली प्रत्यक्ष रोड मात्र झालाच नव्हता या मार्गाने गावातील शेतकरी बांधव व्यापारी वर्ग विद्यार्थी रोज तालुक्याच्या ठिकाणाला जाणे येणे करीत असतात रोडला मोठमोठे एक ते दोन फुटाची खोल खड्डे पडले आहेत त्यामुळे कित्येकदा टू व्हीलर पंचर होत असतात नागरिक बांधव महिलांना गुडघ्याचे कमरेची आजार सुद्धा झपाट्याने वाढ होत आहे याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष होते याबाबत आमचे जिल्हा प्रतिनिधी सतीश काळे यांनी वर्षभरात वारंवार महा न्यूज ७ चॅनल च्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम व लोकप्रतिनिधी यांना जाग आणून दिला आहे . त्यामुळे सदर रोडचे काम सुरू झाले आहे .

महा न्यूज ७ करीत सतीश काळे , वर्धा

ही बातमी पण वाचा : गोधणी निळोणा येथील वाघाई मंदिराची भाविकांना ओढ

You may also like