Home » पतंजली योग समितीच्या वतीने मतदार जागृती कार्यक्रम 

पतंजली योग समितीच्या वतीने मतदार जागृती कार्यक्रम 

by admin
0 comment
Patanjali Yoga Committee

हिंगोली :- तन-मन तंत्रासह लोकतंत्र मजबूत व्हावे यासाठी लोकशाहीत अधिकाधिक लोकांनी मतदान करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन पतंजली योग समितीचे (Patanjali Yoga Committee) प्रांत सदस्य तथा जिल्ह्याचे संरक्षक कुंडलिकराव निर्मले यांनी केले. विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी पतंजली योग समितीने हिंगोली जिल्ह्यात मतदार जनजागृती अभियान राबविण्यास सुरुवात केली यावेळी ते बोलत होते. मतदार जनजागृती अभियाना अंतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये मतदार जनजागृतीची पत्रके वाटप केली जाणार आहेत अशी माहिती पतंजलीचे भारत स्वाभिमान ट्रस्ट प्रभारी विठ्ठल सोळंके यांनी दिली. यावेळी महिला पतंजली योग समितीच्या राज्य कार्यकारणी सदस्य माधुरी शास्त्री जिल्हा प्रभारी ज्योती शेळके, पतंजलीचे बालासाहेब हरण, राजकुमार टिळे, उमेश तोष्णीवाल, अशोक पवार, सतविंदर सिंग सेठी, प्रणत अग्रवाल, आशिष जयस्वाल, संजय नाईक, तानाजी दासूद,,व अन्य योग शिक्षक, साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • प्रतिनिधी/गोपाल सातपुते हिंगोली

You may also like