मेळघाट:-एकशे आठ विराट कुंडीय स्वस्थ संवर्धन गायत्री महायज्ञाचे आयोजन राजमहल रिसॉर्ट धारणी रोड परतवाडा येथे येणाऱ्या एक ते चार डिसेंबर दरम्यान होणार आहे गायत्री परिवार हरिद्वार , तथा गायत्री शक्तीपीठ मंदिर गोरखेडा कुणबी यांनी आयोजित केलेल्या या महायज्ञाच्या माध्यमातून विश्वशांती करिता व विश्व कल्याणाकरिता हे आयोजन गायत्री परिवारातर्फ आयोजित करण्यात आले आहे प्रथम दिवस एक डिसेंबर रोजी परतवाडा शहरातून भव्य कलश यात्रा निघणार आहे द्वितीय दिवस मध्ये ध्यान साधना तथा अन्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे या महायज्ञामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असा आग्रह आयोजकांनी प्रसार माध्यमातून केला आहे
- जुनैद अहेमद परतवाडा मेळघाट