उमरेड : -महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार सुधीर पारवे यांना खैरे कुणबी समाज संघटनेने सोमवारी आपला पाठिंबा जाहीर केला. या पाठिंब्याने आपला विजय अधिक सोपा झाल्याचा विश्वास व्यक्त करत पारवे यांनी कुणबी बांधवांचे आभार मानले.
महायुतीचे उमेदवार सुधीर पारवे यांचा प्रचाराचा झंजावात सुरू आहे. सुधीर पारवे मतदार संघ पिंजून काढत नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. दरम्यान सोमवारी उमरेड येथे खैरे कुणबी समाज संघटनेने सुधीर पारवे यांची भेट घेत त्यांना आपला पाठिंबा अधिकृतपणे जाहीर केला. विधानसभा क्षेत्रात सर्व स्तरातून सुधीर पारवे यांना वाढता पाठिंबा मिळत असून खैरे कुणबी समाज संघटनेच्या पाठिंबामुळे आपला विजय अधिक सोपा झाल्याचा विश्वास पारवे यांनी यावेळी बोलून दाखवला. खैरे कुणबी समाजाचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध राहून त्यांनी टाकलेला विश्वास सार्थकी लावेल असा शब्द पारवे यांनी दिला.
यावेळी खैरे कुणबी समाज संघटनेचे पदाधिकारी, व नागरिक के मोठ्या संख्येने तसेच भारतीय जनता पक्षासह महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती.