भंडारा :-देशाच्या विकासाचा मार्ग गावातून जातो. गाव समृद्ध झाल्यास राज्य आणि देश विकसित होतो. ग्रामीण भागापर्यंत विकासाची गंगा प्रवाहित ठेवण्यासाठी महायुतीच्या पाठीशी उभे रहा आणि महायुतीचा उमेदवार म्हणून आपल्या आशीर्वाद धनुष्यबाणाला द्या, असे आवाहन आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केले.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख लोटल्यानंतर आता प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झाली आहे. गावागावात आणि घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या जात आहेत. आज महायुतीचे उमेदवार आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचार दौरा करीत ग्रामस्थांच्या भेटीत घेतल्या. खैरी, कोथू र्णा, टाकळी, खमाटा, लावेश्वर, इंदूरखा, दाभा, सोनुली, सिल्ली, केसलवाडा, खोकरला, टवेपार, खुरशीपार, मोहदुरा, हत्तीरोई अशा अनेक गावांमध्ये जात नरेंद्र भोंडेकर यांनी महायुतीच्या शासन काळात राबविलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली. आज महिला सक्षम आहे, ती राज्य सरकारच्या कल्याणकारी निर्णयांमुळे. लाडक्या बहिणी योजनेमुळे महिलांना आर्थिक सबल करण्याचे काम केले. युवक युवतींना मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून हाताला काम मिळेल या दृष्टीने प्रशिक्षण व सोबत मानधन देण्याचा निर्णय याच सरकारने घेतला असे सांगताना शहरी पासून ग्रामीण भागापर्यंत विकासगंगा प्रवाहित करण्याचे काम हे सरकार करीत आहे. भंडारा विधानसभा मतदारसंघातही अनेक विकासाची प्रकल्प आणून मतदारसंघाचा कायापालट करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रचार दौऱ्या दरम्यान आमदारांचे ठीक ठिकाणी स्वागत करण्यात आले. महिलांकडून औक्षण करून आशीर्वाद दिले गेले. काही ठिकाणी मोटार सायकल रॅलीच्या माध्यमातून गावात भ्रमंती करण्यात आली. अनेक लहान सभांच्या माध्यमातून यावेळी आमदारांनी ग्रामस्थांना संबोधित केले. या दौऱ्या दरम्यान त्यांनी नव मतदारांशीही संवाद साधला.
- रिपोटर: क्रिष्णा बावनकूले भंडारा महाराष्ट्र