यवतमाळ : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाला उमरखेड येथे मोठा धक्का बसला. एक हजार पेक्षा जास्त अजित पवार गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी अजित पवार राष्ट्रवादी गटाचे जिल्हा उपाध्यक्ष गुणवंत राठोड (Gunwant Rathod) यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्याया चा पाढाच वाचला. त्यांच्यावर अजित पवार गटामध्ये असताना मित्र पक्ष भारतीय जनता पार्टीकडून खोटे गुन्हे दाखल करून त्यांना फसवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला. असे सुद्धा त्यांनी प्रवेशाच्या वेळेस सांगितले. बोलत असताना गुणवंत राठोड यांना आपले अश्रू आवरता आले नाही.
ही बातमी पण वाचा : महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ आणि अभियंता संघटनेचे आंदोलन