Home » चोरट्यांनी फोडले मोटररिवायडिंग चे दुकान

चोरट्यांनी फोडले मोटररिवायडिंग चे दुकान

घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

by Maha News 7
0 comment
Thieves broke into a motor rewiding shop
  • वडकी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात केला गुन्हा दाखल

यवतमाळ :-  राळेगाव तालुक्यातील वडकी येथे चोरट्यांनी मोटररिवायडिंग इलेक्ट्रॉनिकचे दुकान फोडल्याची घटना मध्यरात्री घडली. या घटनेत चोरट्यांनी महागडे कॉपर वायर व ५२ इंच एम आय कंपनीची एलईडी टीव्ही चोरी करून पोबारा केला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

वडकी येथील राळेगाव चौफुली लगत असलेल्या परिसरात नरेंद्र साळवे यांचे श्री संत भोजाजी रिवायडिंग अँड इलेक्ट्रिक चे दुकान आहे  . या दुकानात मध्यरात्री १ च्या  सुमारास चार चोरटे कुलूप लावलेले शटर उचलून आत   घुसले. आधी त्यांनी ड्रॉव्हर उघडून पैसे शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र पैसे न सापडल्यानं त्यांनी दुकानातील महागडे कॉपर वायर,सीसीटीव्ही कॅमरा, एलईडी टीव्ही असा एकूण ४० हजाराचा मुद्देमाल लंपास केला.

हा सर्व प्रकार दुकानाच्या बाजूला लागून असलेल्या शिव पान सेंटर याचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीत झाला आहे.  १९ ऑक्टोबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास शेजारील शिव पान सेंटरचे चालक विजय देठे यांना संत भोजाजी इलेक्ट्रिकल या दुकानाचे शटर उचलल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ दुकानाचे मालक नरेंद्र साळवे यांना फोन करुन दुकानात चोरी झाल्याची माहिती दिली. लगेच साळवे तेथे आले. चोरी झाल्याचे त्यांनी वडकी पोलिसांना कळवले.तात्काळ वडकी पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरखडे यांनी घटनास्थळाची पाहणी करून  पंचनामा केला असून याप्रकरणी नरेंद्र साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडकी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून सीसीटीव्हीच्या सहाय्याने चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

  • यवतमाळ शहर, प्रतिनिधी मकसूद अली यवतमाळ

You may also like