- इच्छुक उमेदवार तिकिटासाठी करताहेत दिल्ली मुंबईची वारी
- उमेदवारी वरून बघायला मिळत आहे मोठे चुरस
वर्धा :- वर्धा विधानसभा मतदार संघात काँग्रेस (Congress) पक्षाकडे डझनभर इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी मागितली असून उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इच्छुक उमेदवारांनी काँग्रेसच्या नेत्यांकडे दिल्ली तसेच मुंबई येथे जात साकडे घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे उमेदवारीवरून मोठी चुरस पाहायला वर्धा विधानसभा क्षेत्रात मिळत आहे.
वर्धा विधानसभा मतदार संघात काँग्रेस कडून निवडणूक लढण्यासाठी बारा जन इंच्छुक असून त्यामध्ये मुख्य म्हणून चार नावे अग्रस्थानी आहे यामधे काँग्रेसचे दिवंगत नेते प्रमोद शेंडे यांचे पुत्र शेखर शेंडे तसेच अभ्युदय मेघे, डॉ सचिन पावडे व सुधीर पांगुळ यांच्यामधे उमेदवारीवरून खरी लढत दिसून येत आहे. उमेदवारीच्या आकांशेवरून इच्छुक हे पक्षाचे काम नंतर करेल की नाराजी दाखवेल. या नाराजीचा फायदा भाजपला तर होणार नाही ना हे पहाने महत्वाचे असणार आहे.
- प्रतिनिधी, सतीश काळे, वर्धा