वसई:-राज्य सरकारच्या महत्त्वपूर्ण ‘लाडकी बहीण` योजनेमुळे अनेक महील्याना आर्थिक सहाय्य लाभले आहे. ही योजना तळागाळातील प्रत्येक महिलेपर्यंत पोहाचावी, त्यातून प्रत्येक महिला सक्षम व्हावी. यासाठी राजन (आप्पा) नाईक मोठ्या मताधिक्क्याने आमदार म्हणून निवडून यावेत, अशी इच्छा शेकडो भगिनींनी (लाडक्या बहिणींनी) व्यक्त केली. भाऊबिजेनिमित्त नालासोपारा विधानसभेतील लाडक्या बहिणीच्या वतीने रविवार, 3 नोव्हेंबर रोजी दुपारी ‘औक्षण कार्यक्रमा`चे आयोजन करण्यात आले होते. नालासोपारा पश्चिम येथील भाजप कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात शेकडो भगिनींनी (लाडक्या बहिणींनी) महायुतीचे उमेदवार राजन नाईक यांना औक्षण करून त्यांच्या विजयासाठी प्रार्थना केली. या प्रसंगी उपस्थितीत भगिनींनी ‘लाडकी बहीण` योजना सुरू केल्याने राज्य सरकारचे आभार मानले. राजन नाईक यांनीही भगिनींचे तोंड गोड करून त्यांच्या संरक्षणासाठी व सक्षमतेकरता आपण वचनबद्ध आहोत, असा विश्वास दिला. दरम्यान; ही योजना तळागाळात पोहोचविण्यासाठी उपस्थित भगिनींना आवश्यक मार्गदर्शनही या वेळी करण्यात आले.
याप्रसंगी भाजपा वसई विरार जिल्हा महामंत्री प्रज्ञा पाटील, महिला मोर्चा महामंत्री संध्या दुबे, मंडळ अध्यक्ष मालती सिंह, मीरा रावल, जिल्हा उपाध्यक्ष व लाडकी बहीण योजना अध्यक्ष मंजरी पंड्या सहित अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते सह अनेक लाडक्या बहीण उपस्थित होत्या अशी माहिती जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मनोज बारोट यांनी माध्यमांना दिली आहे.
- गोवर्धन बिहाडे वसई पालघर