Home » भिख्खू संघामध्ये समाज परिवर्तन करण्याची खरी ताकद ! – केंद्रीय मंत्री किरेण रिजिजू

भिख्खू संघामध्ये समाज परिवर्तन करण्याची खरी ताकद ! – केंद्रीय मंत्री किरेण रिजिजू

by Maha News 7
0 comment
Kiren Rijiju

मुंबई :- भगवान गौतम बुद्ध यांचा विचार तळागाळातील समाजबांधवांपर्यंत पोहचवून समाज परिवर्तन करण्याची खरी ताकद भिख्खू संघामध्ये आहे, मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. असे प्रतिपादन आज केंद्रीय मंत्री किरेण रिजिजू (Kiren Rijiju) यांनी मुंबई येथील एका कार्यक्रमात केले.  माजी मंत्री, मा. आमदार विजय (भाई) गिरकर यांच्या पुढाकाराने समता परिषद मुंबई यांच्या वतीने मुंबईतील दादर येथे भिख्खू संघास भोजनदान व चिवरदान तसेच केंद्रीय मंत्री किरेण रिजिजू यांच्यासोबत संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी समता परिषद मुंबई च्या वतीने भगवान गौतम बुद्ध यांची प्रतिमा देऊन केंद्रीय मंत्री किरेण रिजिजू यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी भिख्खू संघासोबत संवाद साधताना रिजिजू म्हणाले की, मी याठिकाणी तुमच्या आयुष्यातील अडचणी व समस्या जाणून घेण्यासाठी आलो आहे. अल्पसंख्याक मंत्री या नात्याने या सर्व समस्या सोडविण्याचा प्रयत्न मी करणार आहे. त्याचप्रमाणे भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्लक्षीत स्थळांना चिन्हांकित करून त्यांचा विकास देखील मी पुढील काळात करणार आहे. यावेळी ऑल इंडिया भिख्खू संघाचे अध्यक्ष भदंत राहुल बोधी, भाजपचे संघटन मंत्री व्ही. सतीशजी, समता परिषद मुंबई चे कार्याध्यक्ष अशोक कांबळे, सरचिटणीस संजय अढांगळे, महिला प्रमुख योजना ठोकळे, मयुर देवळेकर तसेच मोठ्या संख्येने भिख्खू संघ उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाऊ कांबळे, मिलिंद कांबळे, गुलाब कांबळे, राधेश्याम गुप्ता यांनी प्रयत्न केले.

ही बातमी पण वाचा : आरक्षणाच्या सीडीने पुढे गेलेल्या लोकांनीच आरक्षणाची सीडी कापून टाकली – प्रकाश आंबेडकर

You may also like