यवतमाळ :- निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना तसेच उपक्रम सुरू आहे,त्याचाच एक भाग म्हणून रविवारी सायंकाळी यवतमाळ शहरातील शहर पोलीस स्टेशन व अवधूतवाडी पोलीस स्टेशन हद्दीत मा जिल्हाधिकारी पंकज आशिया, पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या नेतृत्वाखाली रूट मार्च काढण्यात आला या रूट मार्चमध्ये सर्व ठाणेदार ,केंद्रीय पथकातील जवान,दंगा नियंत्रण पथकातील जवान ,जलद प्रतिसाद पथकातील जवान, पोलिसांचा फौजफाटा हजर होता.