Home » तिकीट मिळवण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवाराला महिन्याभर नाना पटोलेंच्या मागे फिरावा लागलं 

तिकीट मिळवण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवाराला महिन्याभर नाना पटोलेंच्या मागे फिरावा लागलं 

अपक्ष उमेदवार शरद गावित यांचे विधान 

by Maha News 7
0 comment
Sharad Gavit
  • अजित पवार यांच्या झालेल्या सभेत दोन ते अडीच हजार लोक असणं हे दुर्दैव

नंदुरबार :- नवापूर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळत असून अपक्ष उमेदवार शरद गावित यांच्याकडून ग्रामीण भागात जोरदार प्रचार सुरू आहे, राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची झालेली सभेत दोन ते अडीच हजार लोक असणं हे दुर्दैव आहे, या सभेमुळे त्यांच्या उमेदवाराची काय परिस्थिती आहे ही समोर आली आहे. काँग्रेसचे उमेदवार शिरीष नाईक हे महिन्याभरापासून नाना पटोलेंच्या (Nana Patole) मागे फिरत होते त्यानंतर त्यांना तिकीट मिळाला आहे. त्याच पद्धतीने भरत गावित हे देखील अजित पवारांच्या मागे फिरत होते तेव्हा उमेदवारी त्यांना मिळाली आहे मात्र मी कुठल्याही पक्षाकडे तिकीट मागायला गेलो नाही. नवापूर विधानसभेतील जनता माझ्यासोबत आहे मला कुठल्याही पक्षाची किंवा चिन्हाची गरज नाही यामुळे माझ्या विजय निश्चित आहे असे विश्वास अपक्ष उमेदवार शरद गावित (Sharad Gavit) यांनी व्यक्त केले आहे.

  • नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी मिर्झा आफिक

You may also like