नंदूरबार :- नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात पिंपळनेर हुन येणारी लहान टेम्पोचे ब्रेक न लागल्याने वाहन दरीच्या 20 फुट खाली कोसळली आहे. या वाहनात लहान बालकांसह 17 प्रवासी असल्याची प्राथमिक माहीती मिळाली आहे. सर्व प्रवासी पिंपळनेर हुन मेळा संपऊन नवापुर येथे खेळणी विक्री साठी येत होते. नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात टेम्पोचे ब्रेक न लागल्याने वाहन दरीच्या 20 फुट खाली कोसळली आहे. या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नसून हे सर्व नवापूर शहरात खेळनी विक्रीसाठी येत होते. जखमीना 108 या रूग्णवाहिकेतुन नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी मध्ये जास्त करुन लहान बालकांचा समवेश आहे, चरणमाळ घाटात अपघाताची मालीका सुरूच असुन यावर सार्वजिक बांधकाम विभागाने उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.
- प्रतिनिधी मिर्झा आफिक