वर्धा :- वर्धा जिल्ह्यातील आर्वी मतदार संघात विद्यमान आमदार दादाराव केचे (Dadarao Keche) यांना भाजपची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी चक्क अपक्ष नामांकन अर्ज दाखल केला आहे . गेल्या अनेक वर्षापासून आमदार दादाराव केचे हे भाजप पक्षाची एकनिष्ठ होते व परिसरामध्ये त्यांनी अनेक कामे सुद्धा केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय सुमित वानखेडे यांना भाजप पक्षाची आर्वी मतदार संघाची तिकीट सुमित वानखेडे यांना वरिष्ठांनी घोषित करण्यात आली आहे .
तसेच आर्वी मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार (Sharad Pawar) गट मधून खासदार अमर काळे यांची पत्नी मयुरा काळे (Mayura Kale) यांना तिकीट जाहीर करण्यात आली आहे .भाजप भाजप पक्षाला पडणारे मतदान सुमित वानखेडे (Sunil Wankhede) व दादारावकीचे यांच्यामध्ये दुभागले जाईल अशी परिसरात चर्चा आहे व याचा फायदा चक्क मयुरा काळे ज्यांना होईल अशी परिस्थितीमध्ये जोरात चर्च सुरू आहे . त्यामुळे आर्वी मतदार संघात कुणाचा विजय होईल याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
- प्रतिनिधी, सतीश काळे वर्धा