भंडारा:-नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या तुमसर मोहाडी विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी महविका स आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार माजी आमदार चरण वाघमारे यांनी मोहाडी तालुक्यांतील जागृत देवस्थान गायमुख इथून आज दि.05 नोव्हेंबर रोजी सकाळी प्रचाराचा नारळ फोडला . याप्रसंगी महादेवाचे भक्तिभावे पूजन करून निवडणूकीत विजयाचा आशीर्वाद मागितला.याप्रसंगी महाविका स आघडीतील घटकपक्ष काँगेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, रिपाई, विकास फाउंडेशन तसेच इतर सहकारी मित्र पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व चरण वाघमारे यांचे हितचिंतक व मित्र मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते
चरण वाघमारे
उमेदवार महा विकास आघाडी
तुमसर विधानसभा
- रिपोर्टर:क्रिष्णा बावनकूले भंडारा