वर्धा :- वर्धा जिल्ह्यातील भोजनखेडा ते आलोंडा बोरगाव या मार्गाने रोज परिसरातील अनेक शेतकरी शेतामध्ये जाणे-येणे करत असतात मात्र फुल वाहून गेल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे शेतकरी सोयाबीन कापूस हे पीक घरी कसे घेऊन जाईल फुल वाहून गेल्यामुळे रोड बंद झाला आहे .
याकडे मात्र या भागातील वरिष्ठ लोकप्रतिनिधीचे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे यांचे दुर्लक्ष दिसून येत आहे .
या ठिकाणी मोठी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही याकडे लोकप्रतिनिधी. सार्वजनीक बांधकाम विभाग व प्रशासनाने लक्ष देऊन नवीन पूल तयार करण्यात यावे अशी मागणी परिसरातील शेतकरी बांधव व नागरिक बांधव करीत आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे व लोकप्रतिचे दुर्लक्ष दिसत आहे शेतकरी सोयाबीन कापूस पीक घरी कसे नेईल हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. या मार्गाने शेतकऱ्यांना जाणे येण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
- प्रतिनिधी, सतीश काळे वर्धा
ही बातमी पण वाचा : सतत पाऊसामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन कापसाचे नुकसान