Home » अकोला पूर्व मतदार संघासह बाळापूर मध्ये रिपाई (आ) चा महायुती मध्ये दावा

अकोला पूर्व मतदार संघासह बाळापूर मध्ये रिपाई (आ) चा महायुती मध्ये दावा

युवा जिल्हाध्यक्ष बुद्धभूषण गोपनारायण करणार दावेदारी

by Maha News 7
0 comment
Buddhabhushan Gopnarayan

अकोला :- अकोला राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूक मध्ये सुरुवात पासूनच महायुती (Mahayuti) सोबत असलेले रिपाई ( आ) या पक्षाचे महायुती उमेदवार यांना मोठया संख्येने रिपाई चे मतदान महायुती घेते मात्र पक्षाला आणि कार्यकर्ते यांना सन्मानजनक वागणूक दिली जात नाही. त्यामुळे अकोला जिल्ह्यात अकोला पूर्व आणि बाळापूर मतदारसंघात रिपाई चे मतदार निर्णायक असून या निर्णायक मतदानाच्या आधारे अकोला जिल्ह्यात २ मतदार संघात रिपाई दावा करणार असल्याचे निवेदन ११ ऑकटोबर रोजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय समाजकल्याण नामदार रामदास आठवले (Ramdas Athawale) यांना नागपूर मुक्कामी दिले असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आम्ही अकोला जिल्ह्यात अकोला पूर्व आणि बाळापूर मतदार संघात निवडणूक लढवीण्यासाठी सज्ज असल्याची माहिती रिपाई आ चे अकोला जिल्हा यु्वाध्यक्ष बुद्ध भूषण गोपनारायण यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी युवक जिल्हा महासचिव अजय गवई, जिल्हा सचिव संघदीप शेगोकार,सूधाकर मोरे, अजय सिरसाट, विनोद जंजाळ, वैभव खंडारे, प्रकाश सदाशीव सह कार्यकर्ते, उपस्थित होते.

  • अकोला प्रेस रिपोर्टर गुलाम मोहसीन

ही बातमी पण वाचा : पवारांची पार्टी विसर्जित करावी लागणार आहे, गोपीचंद पडळकरांचा टोला

You may also like