Home » भाजपाला मजबूत करणारे रेड्डी पक्षातून निलंबित

भाजपाला मजबूत करणारे रेड्डी पक्षातून निलंबित

पत्र भाजपा प्रदेश सचिव मुकुंद कुळकर्णी यांच्या स्वाक्षरीने जारी

by Maha News 7
0 comment
Mallikarjun Reddy

रामटेक :- माजी आमदार व भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मल्लीकार्जून रेड्डी (Mallikarjun Reddy) यांना पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले. यासंबंधीचे पत्र भाजपा प्रदेश कार्यालयातील सचिव मुकुंद कुळकर्णी (Mukund Kulkarni) यांच्या स्वाक्षरीने मंगळवारी जारी करण्यात आले. दरम्यान, पक्षातून निलंबित करण्यात आल्यानंतर रेड्डी यांनी पत्रपरिषद घेत गुरुवार, 17 ऑक्टोबरला भूमिका जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. रामटेक (Ramtek) विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आमदार आशिष जैस्वाल यांचा शिंदे सेनेत प्रवेशानंतर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उमेदवारीची घोषणा केली. त्यामुळे रेड्डी यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. जैस्वाल यांना मदत करणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

भाजपामध्ये फडणवीस, बावनकुळेंची हुकूमशाही रामटेक मतदारसंघात आपण भाजपाला मजबूत केले. कार्यकर्त्यांच्या बळावर सर्वसामान्य न्याय देण्याचा प्रयत्न केला. मागील निवडणुकीत ज्याने युतीधर्म पाळला नाही व अपक्ष उमेदवार होते. त्यांनाच उमेदवारी दिली गेली. पक्षात निष्ठावंतांना किंमत नसल्याची खंत देखील यावेळी त्यांनी व्यक्त केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे जवळचे समजले जाणारे माजी आमदार रेड्डी पुढे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • ब्युरो रिपोर्ट राकेश मर्जिवे रामटेक नागपूर

ही बातमी पण वाचा : शरद पवार बताएं मविआ का मुख्यमंत्री कौन होगा : देवेंद्र फडणवीस

You may also like