Home » राजु तिमांडे व सुधिर कोठारी यांचा शरद पवार गटाचा राजीनामा

राजु तिमांडे व सुधिर कोठारी यांचा शरद पवार गटाचा राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने अतुल वांदिले यांना उमेदवारी घोषित

by Maha News 7
0 comment
Raju Timande and Sudhir Kothari

वर्धा :- हिंगणघाट विधानसभे करीत राष्ट्रवादीकाँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने अतुल वांदिले यांना उमेदवारी घोषित करण्यात आली असुन त्यांनी नामांकन पत्र दाखल केला आहे.यावेळी शरद पवार गटाचे माजी आमदार राजु तिमांडे व सहकार नेते ॲड सुधिर कोठारी यांनी आपल्या पक्षाने उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती मात्र पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज दोद्यांनी अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केला होता .

माजी आमदार राजु तिमांडे व सहकार नेते ॲड सुधिर कोठारी यांनी निखाडे सभागृहात पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा घेऊन सर्वाचे मत जाणून घेतले त्यानंतर सहकार नेते ॲड सुधिर कोठारी यांचा अर्ज मागे घेण्याची व माजी आमदार राजु तिमांडे याची उमेदवारी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा दोघांनीही राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.

  • प्रतिनिधी,  सतीश काळे, वर्धा

You may also like