Home » वर्धा जिल्ह्यातील झिंगाट येथे शरद पवार यांची जाहीर सभा

वर्धा जिल्ह्यातील झिंगाट येथे शरद पवार यांची जाहीर सभा

महाविकास आघाडीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते नागरिक प्रचंड संख्येने उपस्थित

by Maha News 7
0 comment
Sharad Pawar Wardha

वर्धा :- हिंगणघाट विधानसभा ४६ मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) अधिकृत उमेदवार अतुल नामदेवराव वांदिले यांच्या प्रचारार्थ शरदचंद्र पवार (Sharad Pawar) यांची जाहीर सभा हिंगणघाट येथील स्थानिक गोकुलधाम ग्राउंड येथे पार पडली. या सभेला माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रामुख्याने उपस्थिती होते. शेतकऱ्यांसमोरचे प्रश्न, तरुणाईची बेरोजगारीची समस्या, मतदारसंघाचा विकास अशा सर्वच प्रश्नावर हे सरकार अपयशी ठरल्याचे मत माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil Deshmukh) यांनी यावेळी व्यक्त केले. हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील या सर्व समस्या सोडवण्यासाठी तसेच मतदारसंघाच्या सर्वांगीण व सर्वसमावेशक विकासासाठी या सभेला हिंगणघाट, समुद्रपूर, सिंदी रेल्वे विधानसभा क्षेत्रातील समस्त महाविकास आघाडीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते नागरिक प्रचंड संख्येने उपस्थित होते.

  • प्रतिनिधी, सतीश काळे, वर्धा

You may also like