नंदुरबार :- काँग्रेसचे उमेदवाराच्या प्रचारार्थ आज लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी (Rahul Gandhi) नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत असून त्याची जाहीर सभा येथे होणार आहे . या जाहीर सभेसाठी नंदुरबार सह शहादा तळोदा नवापूर, धडगाव येथून काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सभास्थळी जमले .सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे तसेच येणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी करण्यात येत आहे. येणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी करण्यात येत आहे .काँग्रेस उमेदवार किरण तडवी, शिरीष नाईक ,राजेंद्र गावित, के सी पाडवी याच्यासाठी आज नंदुरबार येथे दुपारी एक वाजता खा.राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार असून राहुल गांधी आजच्या सभेत काय बोलतात त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
- मिर्झा आफिक , नंदूरबार