Home » प्रेमसागर गणवीर यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

प्रेमसागर गणवीर यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

दलित अस्मितेसाठी स्वतंत्र उभे

by Maha News 7
0 comment
Premsagar Ganveer

भंडारा :- काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ता आणि भंडारा विधानसभा निवडणुकीतील उमेदवार प्रेमसागर गणवीर (Premsagar Ganveer) यांनी अपक्ष म्हणून उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेसमध्ये असलेल्या नाना पटोलेंवर (Nana Patole) राजकीय द्वेषाचा आरोप केला. गणवीर म्हणाले की, काँग्रेसमध्ये असतानाही पटोलेंनी त्यांना अनेकदा डावलण्याचे काम केले. पस्तीस वर्षे प्रामाणिकपणे काँग्रेससाठी काम करूनही, एका विशिष्ट समाजाच्या दबावामुळे त्यांना अधिकृत उमेदवारी नाकारण्यात आली, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गणवीर यांचा आरोप आहे की काँग्रेसमध्ये एका समाजाचे वर्चस्व असून दलित समाजाला केवळ ‘वोट बँक’ म्हणून पाहिले जाते. “मी बंडखोर नाही, मात्र दलित अस्मिता टिकवण्यासाठी स्वतंत्र उभा आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यांच्या या निर्णयाला अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शविला आहे, ज्यामुळे निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे.

  • रिपोटर :क्रिष्णा बावनकूळे भंडारा महाराष्ट्र

You may also like