नांदेड :- आजची सगळ्यात मोठी बातमी म्हणजेच नांदेडचे भाजपाचे बडे नेते असलेले माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांनी आपल्या पुत्रासह म्हणजेच प्रवीण पाटलांसह मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. नेमकं या प्रवेशामाचं कारण काय हे कळण्याआधीच त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत लोहा येथून उमेदवारी ही दिली आहे पक्षांमधील अंतर्गत नाराजी की लोकसभेमध्ये झालेला पराभव यापेक्षा कदाचित हा महायुतीचा नवा डाव तर नसेल ना… परंतु या प्रवेशामुळे व उमेदवारीमुळे नांदेड मधील भाजपाच्या ताकदीवर नक्कीच परिणाम होणार हे मात्र निश्चित. या सर्व गोष्टींचा नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाला विधानसभेत किती फायदा होईल हे मात्र निकालानंतरच कळेल.
- लक्ष्मीकांत मुंडे, नांदेड