वर्धा :- वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर पोलीस स्टेशन (Allipur Police Station) मध्ये शांतता समिती बैठक पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल चव्हाण यांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते .
यावेळी मंचकावर प्रमुख उपस्थिती पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल चव्हाण (Rahul Chavhan) ठाणेदार प्रफुल डाहूले पोलीस सहायक उपनिरीक्षक अश्विन खेडेकर माजी खासदार सुरेश वाघमारे हे होते .
यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल चव्हान यांनी होणारी निवडणूक विधानसभा निवडणूक गावामध्ये शांततेत पार पाडावी याबाबत मार्गदर्शन केले उपस्थित पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली व सविस्तर मार्गदर्शन केले .यावेळी गावातील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नाना ढगे माजी पंचायत
समिती सदस्य अशोक सुपारे माजी ग्रामपंचायत सदस्य गोपाल मेघरे सह गावातील अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
- प्रतिनिधी सतीश काळे, वर्धा