वसई :- वसई विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे विजय पाटील (Vijay Patil) उमेदवार म्हणून यांना जाहीर करण्यात आले आहे वसई मतदार संघ काँग्रेससाठी सुटावा म्हणून स्थानिक नेते आग्रही होते. कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने फटाके फोडून उमेदवार यांचे स्वागत केले. काँग्रेसचे विजय पाटील वसई 133 मतदार संघाचे उमेदवारी मिळाल्यामुळे आता मतदारसंघांमध्ये काट्याची टक्कर होण्याचे दाट शक्यता निर्माण झाली आहे आज पर्यंत बहुजन विकास आघाडीच्या एक हाती सत्ता असलेल्या मतदार संघ काँग्रेसच्या हाती जाणार कि बहुजन विकास आघाडीकडे राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- गोवर्धन बिहाडे वसई पालघर