पालघर:-विरार – ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत आपण कायमच बोईसर विभासभा मतदारसंघाचा विकास केला आहे असे सांगतानाच आ. राजेश पाटील यांनी आपण केलेल्या विकासकामांची माहिती दिली. राजेश पाटील हे मागच्या ५ वर्षांपासून बोईसर मतदारसंघाचे विद्यमान आमदार असून येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी ते बहुजन विकास आघाडीचे बोईसर मतदारसंघाचे उमेदवार आहेत. त्यांनी आपल्या मतदारसंघात काम करताना कायमच ग्रामीण भागाच्या विकासाला प्राधान्य दिल्याचे दिसून येते.
आदिवासी समाजात शिक्षण दर वाढावा यासाठी त्यांनी ७ वस्तीगृहांच्या उभारणीमासाठी मंजुरी मिळवून घेतली जेणेकरून आदिवासी विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. तसेच पालघर हा शेतीप्रधान जिल्हा असल्याने त्यांनी आ. हितेंद्र ठाकूर, आ. क्षितिज ठाकूर यांच्यासोबत कृषी महाविद्यालयासाठी ६० एकर जागा मंजूर करून घेतली असून यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. हे विद्यापीठ झाल्यानंतर आदिवासी विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
आपल्या मतदारसंघातील आरोग्यासंबंधी समस्या सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे त्यासाठी बोईसर ग्रामीण रुग्णालयासाठी २५ कोटी मंजूर करून घेतले आहेत. तसेच खनिवडे येथील ग्रामीण रुग्णालयासाठी १४ कोटींचा निधी मंजूर केला. सफाळे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना तात्काळ उपचार घेता यावे म्हणून ही कामे करण्यात आली. ज्याचा फायदा तेथील नागरिकांना होत आहे.
येत्या विधानसभा निवडणुकी संदर्भात ते म्हणाले की, “आमच्या पक्षाने बहुजन विकास आघाडीने मला संधी दिल्याने मी निवडणूक लढतो आहे. स्पर्धा करण्यापेक्षा केलेल्या विकास कामांच्या जोरावर मी लोकांमध्ये जाणार आहे. लोकांना माझ्यावर विश्वास आहे. लोकं माझ्या कामावर खुश आहेत. विरोधकांकडून देखील मला भेटून माझ्या कामाविषयी प्रशंसा करतात. आमदार राजेश पाटील
- गोवर्धन बिहाडे वसई पालघर