Home » वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांचे काँग्रेस पक्षप्रवेशाच्या बातम्या खोट्या

वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांचे काँग्रेस पक्षप्रवेशाच्या बातम्या खोट्या

कार्यकर्ते शेतात तर बातमीत नाव कसे - सागर भवते यांचा सवाल

by Maha News 7
0 comment
Sagar Bhavte

चांदूरबाजार :- दि.१२ऑक्टोबर रोजी काही वृत्तपत्रात वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याच्या बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या. सदर बातम्या पूर्णतः खोट्या असून पक्षप्रवेशाचे दिवशी बातमी मध्ये नाव असलेले कार्यकर्ते शेतात होते तर बातमीमध्ये नाव कसे छापण्यात आले असा सवाल वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी केला आहे.तिवसा तालुक्यातील ग्रामीण भागात वंचित बहुजन आघाडीची बांधणी मजबूत झाली असून बहुतांश गावात शाखा आहेत. काँग्रेसच्या (Congress) आमदार ऍड. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी बौद्ध जनतेला आकर्षित करण्यासाठी महिलांना दीक्षाभूमी नागपूर येथे दर्शनासाठी नेत असून नागपूर येथे जाण्याआधी अमरावती कडे गाडी वळवून यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी महिलांच्या गळ्यात काँग्रेस पक्षाचे दुपट्टे टाकून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या नावे पक्षप्रवेशाचा बनाव केल्या जात आहे. या प्रकारचा वंचित बहुजन आघाडीने तीव्र निषेध केला असून आमदार ठाकूर यांच्या ढोंगी वृत्तीला बौद्ध जनतेने बळी पडू नये असे आवाहन सागर भवते (Sagar Bhavte) यांनी केले आहे.

दि.१२ऑक्टोबर रोजी काही वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेल्या पक्षप्रवेशाच्या बातम्या पूर्णतः चुकीच्या आणि खोट्या असून वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकाऱ्यानी धारवाडा गावात भेट देत कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली असता आम्ही आमच्या शेतात कामात असताना काँग्रेस पक्षप्रवेशाच्या बातमीमध्ये आमचे नाव कसे आलें आम्हाला कळले नाही. वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्याचा हा प्रकार असून आम्ही वंचितचे कट्टर कार्यकर्ते आहोत अशी प्रतिक्रिया पक्षप्रवेशच्या बातमी मध्ये नाव असलेले अंकुश बन्सोड यांनी दिली आहे. काँग्रेस च्या पक्ष प्रवेशच्या ठिकाणी उपस्थित नसलेले मात्र बातमीमध्ये नाव असलेले अवधूत बन्सोड, संदीप काळे, सागर काळे, राजेंद्र बन्सोड, अंकुश बन्सोड, संगीता बन्सोड, मुक्ता बन्सोड, पुष्पा बन्सोड, बेबीबाई बन्सोड, भाग्यश्री काळे, पूजा बन्सोड यांनी काँग्रेस पक्षाच्या या खोडसाळ बातमीचा निषेध केला असून आम्ही सर्वजण वंचित बहुजन आघाडी सोबत एकनिष्ठ असल्याची ग्वाही दिली आहे. यावेळीं धारवाडा येथे वंचितचे जेष्ठ नेते गुणवंत ढोणे, जिल्हा उपाध्यक्ष दादाराव गडलिंग, डॉ. धर्मेंद्र दवाळे, प्रमोद मुंद्रे, प्रवीण काळे, सुदेव बन्सोड, नितेश बन्सोड, सागर काळे, सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दि.१२ ऑक्टोबर रोजी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याच्या बातम्या मध्ये जे कार्यकर्ते घरी अथवा शेतात कामावर होते त्यांचे नाव छापण्यात आले आहे. सर्व कार्यकर्ते वंचित सोबत एकनिष्ठ आहेत. वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न काँग्रेस कडून सुरू असून चुकीच्या बातम्या ज्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत त्यांना कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याची प्रतिक्रिया जिल्हा महासचिव सागर भवते यांनी दिली आहे.

  • प्रतिनिधी, रत्नदीप तंतरपाळे, चांदूरबाजार

ही बातमी पण वाचा : आमगाव विधानसभा उमेदवारी वरून समर्थकांत तुफान राडा, कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

You may also like