चंद्रपुर :- आज चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या पुढाकाराने बाबूपेठ वासीयांचे स्वप्न साकार झाले आहे. आज या दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमीवर लाखो नागरिकांना दीक्षा दिली होती त्यामुळे बाबूपेठ उड्डाणपूलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आहे. बाबूपेठ उड्डाणपूलाचा नामकरण सोहळा आज चंद्रपूरचे पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की मी अर्थमंत्री असताना या उड्डाणपूलाला केंद्र सरकारतर्फे मंजुरी मिळवून दिली आणि बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाचे काम सुरू झाले मात्र महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर निधी थांबला आणि काम पुन्हा थांबले नंतर महायुतीचे सरकार आल्यावर उड्डाणपुलाच्या कामाला गती मिळाली आणि आज हा उड्डाणपूल तयार झाला आहे. आज शुभ नागरिकांची मागणी नुसार या उड्डाणपुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव देण्यात आले आहे.
ही बातमी पण वाचा : अकोला पूर्व मतदार संघासह बाळापूर मध्ये रिपाई (आ) चा महायुती मध्ये दावा