वर्धा :- वर्धा जिल्ह्यातील आर्वी विधानसभा मतदार संघातू शरद पवार (Sharad Pawar) गट तिकीट जाहीर झाली असून खासदार अमर काळे यांची पत्नी मयुरा काळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर लढणार आहे . आर्वी विधानसभा क्षेत्र मधून खासदार अमर काळे (Amar Kale) च्या पत्नी मयुरा काळे (Mayura Kale) यांना सीट जाहीर होतास मात्र पक्षातून नाराजीचा सूर सामोर दिसत आहे घराणेशाही राजकारण हे कारण आड येत आहे . मात्र खासदार पत्नी मयुरा काळे यांची परिसरात चांगली ओळख आहे व महिला बचत गट महिला यांच्या बाजूने आहे तसेच सामाजिक कार्यात त्या अनेक वर्षापासून सक्रिय आहे व जातीय समीकरणाच्या माध्यमातून ही सीट शरद पवार गट जाहीर करण्यात आली आहे . त्यामुळे भाजप पक्षाच्या उमेदवाराला थेट लढत म्हणून ही सीट जाहीर केल्याचे बोलली जात आहे .
शरद पवार गट द्वारे खेळी खेळून मयुरा काळे यांना सीट देण्यात आली आहे मात्र वरिष्ठ राजकीय मंडळी आम्हाला का डावल गेले अशी चर्चा करीत आहे व घराणेशाहीला आळा कधी बसेल अशी चर्चा कार्यकर्ते करीत आहे .त्यामुळे वेळच आता सांगू शकेल की निवडणुकीत काय होईल.
- प्रतिनिधी, सतीश काळे वर्धा