Home » दिग्रस विधानसभा मध्ये काँग्रेस पक्षाचे मानिकराव ठाकरे शिक्का मोर्तब

दिग्रस विधानसभा मध्ये काँग्रेस पक्षाचे मानिकराव ठाकरे शिक्का मोर्तब

by Maha News 7
0 comment

दिग्रस :- महायुतीचे उमेदवार संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी दिनांक 24 ऑक्टोबर रोजी दारव्हा येथे नामांकन अर्ज दाखल केला मात्र महा विकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार अद्यापही डब्यात बंद होते आज सकाळी पवन जयस्वाल यांना उमेदवारी मिळाली असल्याची चर्चा सर्वत्र चालू होती. काही माध्यमांनी पवन जयस्वाल यांना उमेदवारी मिळाल्याची बातमी सुद्धा प्रकाशित केली मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माणिकरावजी ठाकरे यांच्या नावावर शिक्का मोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे यामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आला आहे दिग्रस मतदारसंघांमध्ये संजय राठोड आणि विरोधात उमेदवार मिळत नसल्याची चर्चा दिग्रस मतदारसंघांमध्ये चालू होती पवन जयस्वाल यांना उमेदवारी मिळाल्यामुळे संजय राठोड यांचा मार्ग मोकळा असल्याचे सुद्धा सर्वत्र बोलल्या जात होते मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकरावजी ठाकरे यांना दिग्रस मतदारसंघाचे उमेदवारी मिळाल्यामुळे आता मतदारसंघांमध्ये काट्याची टक्कर होण्याचे दाट शक्यता निर्माण झाली आहे आज पर्यंत शिवसेनेच्या हातात असलेला मतदार संघ काँग्रेसच्या हाती जाणार की संजय राठोड पुन्हा बहुमताची बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

You may also like