पश्चिम नागपुर:-अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या कामांना पहिले हातशी धरून ते पूर्णत्वास आणण्याचे काम आपण केले. गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात पश्चिम नागपुरात कोट्यावंधीचा निधी मंजूर करून विकास कामे हे आज सर्व प्रभागातून दिसून येत आहे. यातील बहुतांश कामे झाली असून अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. पश्चिम नागपुरातील प्रत्येक प्रभागात सिमेंट रस्ते, डांबरीकरण, खडीकरण, विद्युत खांब, विद्युत दिवे, आयब्लॉक, ड्रेनेज वॉटर कामे करण्यात आली. विकास कामे करताना मी कधीही जात-पात धर्मपंथ याचा विचार केला नाही. त्यामुळे मतदारांचा आपल्यावरील विश्वास आणखीनच दृढ झाला आहे. म्हणूनच आपल्याला पुन्हा पाच वर्षासाठी निवडून देण्याचा निर्णय येथील मतदारांनी घेतला असा विश्वास पश्चिम नागपुरचे विद्यमान आमदार, नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी व्यक्त केला.
रविवारी सायंकाळी जन-आशीर्वाद यात्रेदरम्यान सुरेंद्रगढ भवानी माता मंदिरात एका छोटेखानी सभेत विकास ठाकरे म्हणाले की, बदलत्या काळात विकासाच्या बदलत्या संकल्पना आत्मसात करीत सामान्यांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी मागील पाच वर्षांत मी काम केले. जनसामान्यांच्या विश्वासामुळेच काम करण्याचे मला बळ मिळत आहे. महाविकास आघाडीने मूलभूत समस्या आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी यांसारख्या मुद्द्यांवर विशेष लक्ष दिले. सर्वसामन्यांना लक्षात ठेवून पाच वर्षाचे कामे पश्चिम नागपुरात करण्यात आले. प्रभागातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सामान्यांना सतत भेडसावणाऱ्या समस्येला प्राधान्य देऊन त्या सर्व समस्यांचे निराकरण करण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही विकास ठाकरे म्हणाले.