बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा नांदुरा खामगांव. शेगावं, जळगावजामोद संग्रामपूर तालुक्यात सतत पाऊस सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन कापूस उलिड मुंग सह पिकांचे नुकसान झालेआहे, मागील महिन्यात सुद्धा सततदार पाऊस पडल्यामुळे सोयाबीन चे आणि मुंग उलिड पाण्यात भिजून सडला आहे,विमा कंपणीचे प्रतिनिधि शेतकऱ्याची थत्ता करीत आहेत ११अक्तोबर् रात्री १० वजतापसुन् संग्रामपूर तालुक्यातील कवठलं परिसरात सकाळी आठ वाजेपर्यंत सतत धार पाऊस सुरू होता, रात्रभर पाऊस सुरू असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांचे सोयाबीन सोंगने चालू आहे,काही शेतकऱ्यांनी सोयाबीन सोंगून गंजी मारले तर काही शेतकऱ्यांनी सोयाबीनचे सोंगणी करुंन शेतात पडले आहे,रातभर पाऊस पडल्यामुळे शेतात पडून असलेले सोयाबीनचे ढीग पाण्याने भिजले मूळे खराब झाली आहे, सडले आहे,काही शेतकऱ्यांच्या शेतात पानी वाहून गेले होते, तर काहींच्या शेतात पानी साचले आहे,त्यामुळे पिकांची माती झाली आहे तरी सुधा शासनाने शेतकऱ्यांना कोणतीच मदत दिली नाही, सध्याचे मंत्री आमदार यांना शेतकऱ्यांच्या शेतात जायला वेळ नसून फक्त विविध कामांचे भूमिपूजन लोकार्पण उदघाटनाच्या कार्यक्रम करुन मग्न आहेत,पुढील विधन्सभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन जानेला हातींचॉकलेट देऊन फिरत आहेत,शेतकरी बांधावाना वाऱ्यावर सोडले की काय ,असा जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झालाय, तरी महाराष्ट्र शासनाने कृषी विभागाने शेतकऱ्याची होत असलेली फजिती ची पाहणी करुन बळीराजाला मदत करावी अशी अपेक्षा शेतकरी करीत आहे.
- महान्यूज 7 कारिता सचिन पाटील प्रतिनिधि शेगांव बुलाढाना