वर्धा :- वर्धा जिल्ह्यातील कापसी टोलनाका येथे नाकेबंदी करीत असता एक हिरवी टि-शर्ट अंगात घातलेला इसम हा आपल्या मोटार सायकलच्या मागे एका प्लॉस्टिकचे चुंगडी भरलेली आनताना दिसला. त्याला थांबण्याचा इशारा दिला असता सदर इसम हा न थांबता आपल्या ताब्यातील मोटार सायकल वेगाने चालवुन आमच्या जवळुन निघुन गेला. सदर इसमाचा शासकीय वाहनाने पाठलाग करीत असता सदर इसम हा कात्री कडे जाण्यास निघाला. तेव्हा आम्ही सुध्दा आमचे वाहन त्याचे पाठीमागे नेले थोड्या अंतरावर जाऊन सदर इसमाने त्याचे ताब्यातील वाहन हे एका शेताच्या बाजुला पाडुन शेताने पळला तेव्हा त्याचा पो. स्टॉफचे मदतीने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव सोहेल जावेद खॉ पठान, वय 21 वर्ष रा. मारोती वार्ड, हिंगणघाट जि. वर्धा असे सांगीतले. त्याने शेताजवळ फेकलेल्या प्लॉस्टीकच्या चुगडीची पाहणी केली असता त्यामधे चार खडांचे खोक्यामध्ये 180 ml च्या रॉयल स्टेज कंपनीच्या 192 शिश्या प्रती शिशी 300 रु. प्रमाणे 57,600/- रू. व एक हिरो कपनीची पेंशन प्रो मोटार सायकल क्र. MH-32- AL-105 सदर कारवाई अल्लीपूर पोलीस स्टेशन येथील ठाणेदार प्रफुल डाहूले जमादार अजय रीठे जमादार व त्यांच्या टीमने केली .
- प्रतिनिधी, सतीश काळे, वर्धा