भंडारा :- भंडारा विधानसभा क्षेत्रात दिनांक 28 ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) घटक पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार नरेंद्र पहाडे यांनी आपला उमेदवारी अर्ज हजारो समर्थकांच्य्या उपस्थितीत दाखल केला. यावेळी जनतेच्या विश्र्वसाचा पहाड नरेन्द्र पहाडे (Narendra Pahade) यांनी उचलल्याचे चित्र दिसून आले.
शहरांतील जलाराम मंगल कार्यालयातून रॅलीला सुरूवात झाली व गांधी चौक, पोस्ट ऑफीस चौक, मोठा बाजार,त्रिमूर्ती चौक, या मार्गे भ्रमंती करुण गांधी शाळा भंडारा येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मोठ्या प्रमाणावर विधानसभा क्षेत्रातील पवणी व भंडारा तालुक्यातील अनेक गावातील युवा कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी होते. या रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रबोधनकार तुषार सूर्यवंशी यांच्या कार्यक्रमाने सुरुवात होत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मारल्यापन करत, रॅलीमध्ये पारंपरिक वाद्य डफली वाजवत , जोरदार घोषणाबाजी देत नरेंद्र पहाडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
- रिपोर्टर: क्रिष्णा बावनकुळे भंडारा, महाराष्ट्र
ही बातमी पण वाचा : आर्वी मतदार संघात भाजपाचे उमेदवारी सुमित वानखडे यांना जाहीर