Home » किचन किट वाटप कार्यक्रमात सावळा गोंधळ, महिलांचा संताप

किचन किट वाटप कार्यक्रमात सावळा गोंधळ, महिलांचा संताप

आमदार महोदयांना मध्यरात्री याव लागल सभामंडपी !

by Maha News 7
0 comment
kitchen kit distribution program wadi

नागपुर :- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलायत। या निवडणुकांना बघता सरकारन योजनांची अक्षरसः झड़ी लावल्याच स्पष्टच आहे, त्यात बांधकाम कामगार योजनेतील कामगार पेटी आणि किचन किट वाटप जोमात सुरु आहे. आणि त्यातही गोंधळ, आक्रोश, भांडण आदि देखील या वाटपादरम्यान होत असल्याच्या बातम्या येतायेत. यातच वाडी येथील रामकृष्ण सभागृह महादेव नगर नजिक एका मैदानात या साहित्यक वाटप गेल्या ४-५ दिवसांपासून सुरु असून येथेही हाच सावला गोंधळ पहावयास मिळाला. दि ११ ऑक्टोबर रोजी साहित्यासाठी लाभर्थांच्या लांबच लांब रांगा बघावयास मिळल्या. लाभार्थी मध्यरात्री, पहाटे २-३ दिवसांपासून येथे उपाशी तापाशी जम धरून बसून असल्याचं दिसलं. त्यातही जेव्हा सकाळपासून रांगेत लागून रात्री काही लाभार्थ्यांना टोकन नाकारलं गेलं तेव्हा महिला अक्रम झाल्या आणि स्टेज वर तोडफोफ करण्यास सुरवात झाली. यात एका युवकान आयोजकांशी वाद घातला तेव्हा त्याला मारहाण करण्यात आली. यात महिला आणखीनच अक्रोशीत झाल्या. अखेर आयोजकांना मध्यरात्री १ वाजता हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार महोदय समीर मेघे (Sameer Meghe) यांना बोलवून घ्यावं लागण त्यांच्या संबोधनानंतर टोकन वाटप करून रविवार रोजी साहित्य देणार असल्याचं सांगण्यात आलं. या केंद्रावर एक दोन सोडून कित्तेक गावांचं एकावेळी वाटप केल्यानं हा गोंधळ उडाल्याच समोर आलं.  गावनिहाय वाटप करण्यात यावा असं लाभार्थ्यांच देखील म्हणणं होत. इकडे काही लाभार्थी जाण्याचं संधान नसण्यान सभामंडपी रात्रभर थांबले. त्यात पावसानं त्यांना हैराण केलं. तर पावसामुळे विद्युत तारा मध्ये करंट येऊन बराच वेळ आगीचा लोळ उठला. सुदैवानं यात कुणालाही धक्का लागला नाही.

महा न्यूज ७, आंचल लोखंडे, वाडी नागपूर

You may also like