यवतमाळ :- आर्णी केळापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून काही स्थानिक नेत्यांनी मुलाखती दिल्या प्रत्येक जण उमेदवारी मिळावी यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे काहींनी तर लॉबी चालवली आहे. यात एका मंत्री पुत्राचा समावेश असून त्याने आर्थिक जोराच्या भरोशावर दिल्लीपर्यंत फिल्डिंग लावल्याचे बोलल्या जात आहे.
या मंत्री पुत्राला उमेदवारी मिळाल्यास आर्णी मतदारसंघात काँग्रेसमध्ये उभी फूट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही हा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या जुन्या लोकांनी आपल्या कार्याच्या भरोशावर काँग्रेसकडे शाबूत ठेवला होता मात्र त्यानंतर २०१४ साली या मतदारसंघात भाजपाचे प्रा.राजू तोडसाम व २०१९ डॉ.संदीप धुर्वे ने काँग्रेसचा हा गड आपल्या ताब्यात खेचून आणला मात्र काही महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांना प्रचंड मताधिक्य मिळालं तेव्हापासून आर्णी मतदारसंघावर अनेकांचा डोळा आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रतिभा ताईना प्रचंड मताधिक्य मिळाले. पक्षाकडे योग्य आणि सक्षम उमेदवार नाही का? पैसे म्हणजेच पात्रता काय? पैसे म्हणजेच योग्यता काय?
ही बातमी पण वाचा : प्रहार आणि शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज केला दाखल