Home » मी तुतारी वर लढणारच ! माजी आ.संदीप बाजोरिया यांची प्रतिक्रिया  

मी तुतारी वर लढणारच ! माजी आ.संदीप बाजोरिया यांची प्रतिक्रिया  

आघाडीत बीघाडी होण्याची शक्यता

by Maha News 7
0 comment
Sandeep Bajoria

यवतमाळ :- विधानसभा निवडणूक जस जशी जवळ येत आहे. तसे तसे राजकीय पक्षातील समीकरण वेगवेगळ्या वळणार जात आहे.  महविकास आघाडी टिकून राहावी यासाठी वरिष्ठ नेते प्रयत्न करत आहे. मात्र यवतमाळ जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया (Sandeep Bajoria) यांनी यवतमाळ विधानसभा मतदार  संघातून तुतारी वरच लढणार असल्याचा निर्णय घेतला.   मला शरद पवार साहेबांनी शब्द दिल्याचे  असून  वेळ पडल्याचा काँग्रेस सोबत माझी मैत्री पूर्व निवडणूक होणार असल्याचे सांगून महविकास् आघाडीला ऐक प्रकारे धक्का दिला. बाजोरिया यांनी गेल्या महिन्या भर्यापासून यवतमाळ विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला आणि पोस्टर बाजी च्या माध्यमातून तुतारी सर्वत्र पोहाच्याचे दिसून येते. मात्र बाजोरिया घेतलेल्या भूमिकेमुळे आघाडीत बीघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  • यवतमाळ शहर, प्रतिनिधी मकसूद अली

You may also like