Home » माजी आमदार राजू तिमांडे व सुधीर कोठारी यांनी अपक्ष नामांकन अर्ज दाखल

माजी आमदार राजू तिमांडे व सुधीर कोठारी यांनी अपक्ष नामांकन अर्ज दाखल

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अनेक राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित 

by Maha News 7
0 comment
independent nominations

वर्धा :- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाची तिकीट न मिळाल्यामुळे आता चक्क माजी आमदार राजू तिमांडे (Raju Timande) व कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सुधीर कोठारी (Sudhir Kothari)  यांनी बंडखोरी केल्याचे चित्र दिसत आहे अपक्ष नामांकन अर्ज दाखल केला आहे .हिंगणघाट मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट तिकीट अतुल वांदीले यांना मिळाली असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात दोन गट झाले आहे त्यामुळे चक्क माजी आमदार राजू तीमांडे व कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट चे राष्ट्रवादी पक्षाची ज्येष्ठ नेते सुधीर कोठारी यांनी आमदारासाठी नामांकन अर्ज दाखल करून बंडखोरी केली आहे. नामांकन अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अनेक राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत नामांकन अर्ज दाखल करण्यात आला. हिंगणघाट मतदार संघात शरद पवार गटामध्ये दोन  गट पडल्याने भाजप पक्षाचे उमेदवार आमदार समीर कुणावर यांना यांचा फायदा होईल असे बोलले जात आहे .

  • सतीश काळे वर्धा

ही बातमी पण वाचा : भाई शब्बीर खान यांनी केला नामांकन अर्ज दाखल

You may also like