वर्धा :- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाची तिकीट न मिळाल्यामुळे आता चक्क माजी आमदार राजू तिमांडे (Raju Timande) व कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष सुधीर कोठारी बंडखोरी केल्याचे चित्र दिसत आहे माजी आमदार राजू तीमांडे अपक्ष लढणार आहे.
हिंगणघाट मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट तिकीट अतुल वांदीले यांना मिळाली असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात दोन गट झाले आहे त्यामुळे चक्क माजी आमदार राजू तीमांडे व कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट चे राष्ट्रवादी पक्षाची ज्येष्ठ नेते सुधीर कोठारी यांनी आमदारासाठी नामांकन अर्ज दाखल करून बंडखोरी केली आहे.
हिंगणघाट मतदार संघात शरद पवार गटामध्ये दोन गट पडल्याने भाजप पक्षाचे उमेदवार आमदार समीर कुणावर यांना यांचा फायदा होईल असे बोलले जात आहे.
- प्रतिनिधी, सतीश काळे वर्धा