यवतमाळ :- उमरखेड-महागाव मतदार संघात (Umarkhed-Mahagaon Constituency) महिलेने प्रथमच विधानसभा निवडणुकी (Vidhan Sabha Election) करीता टिकीट मागीतली आहे. दोन गटाच्या अंतर्गत कलहामुळे उमरखेड- महागाव मतदार संघात राजकारण धुळीत मिसळत चाललेले आहे. त्यामुळे 2019 सालापासून मीनाक्षी सावळकर यांनी या मतदारसंघात अनेक कामे पार पाडलेली आहेत. त्यामध्ये काँग्रेस पक्ष वाढवणे तसेच अनेक युवकांना पक्षांमध्ये सामील करून घेणे अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्यात. मतदार संघ व मतदार संघात पक्षाची बांधणी करून काँग्रेस पक्षाची ताकद वाढवली. याच ताई गेल्या दहा दिवसापासून मुंबई असो वा दिल्ली येथे पक्षाची तिकीट मिळवण्यासाठी तळ ठोकून बसलेल्या आहेत. त्यासाठी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांच्या व महाराष्ट्रातील नेत्यांकडे पक्षाची तिकीट ही महिलेला द्यावी याची मागणी करीत आहेत. पक्षानेही त्यांना आजपर्यंत केलेल्या काँग्रेस पक्षाच्या बांधणीसाठी व केलेल्या कामासाठी नक्कीच तुम्हाला फळ मिळेल असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे तिकीट यावेळेस उच्च विद्याविभूषित,तडफदार,युवा रणरागिणी प्रा.डॉ.मीनाक्षी सावळकर मिळेल अशी चर्चा उमरखेड- महागाव मतदार संघातील जनतेमध्ये आहे. १७ ऑक्टोंबर रोजी आमदार बाळासाहेब थोरात यांची भेट सावळकर यांनी विधान भवनात घेतली. प्रा.डॉ. मीनाक्षी यांनी उमरखेड – महागाव मतदार संघ महिलेला द्यावा याबद्दल थोरात यांचेशी सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगीतले.
- यवतमाळ शहर, प्रतिनिधी मकसूद अली यवतमाळ