Home » हरघर संविधान उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर समिती

हरघर संविधान उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर समिती

संविधानीक मुल्यांच्या जागरांसाठी 26 नोव्हेंबरपासून वर्षभर होणार विविध उपक्रम

by admin
0 comment
Dr. Vipin Itankar

नागपुर :- भारतीय संविधानास 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्याने 26 नोव्हेंबर, अर्थात संविधान दिनापासून वर्षभर हरघर संविधान साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. भारतीय संविधानातील मूल्य प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचावेत, स्वातंत्र्याच्या मुल्यांसह राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला बहाल केलेल्या अधिकारासह राष्ट्रासाठी कर्तव्याची जाणीव अधिक व्यापक व्हावी यासाठी नागपूर जिल्ह्यात विविध उपक्रमांच्या माध्यमातून संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करू, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर (Dr. Vipin Itankar) यांनी सांगितले. दिनांक 26 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या संविधान दिनाच्या निमित्ताने आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, सहायक आयुक्त समाज कल्याण सुकेशनी तेलगोटे व अधिकारी उपस्थित होते.

You may also like