Home » 75 वरोरा विधानसभेमध्ये भाजपचे विधानसभा प्रमुख रमेश राजुरकर यांची नाराजी

75 वरोरा विधानसभेमध्ये भाजपचे विधानसभा प्रमुख रमेश राजुरकर यांची नाराजी

हंसराज अहिर यांनी घेतली रमेश राजूरकर यांची भेट

by Maha News 7
0 comment
Assembly Speaker Ramesh Rajurkar

चंद्रपूर :- मागील काही दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभेचे उमेदवार जाहीर करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांना कसरत करावी लागली होती. भाजपाचे युवा नेते करण देवतळे यांची उमेदवारी जाहीर होताच स्थानिक विधानसभा प्रमुख रमेश राजुरकर (Assembly Speaker Ramesh Rajurkar) यांची नाराजगी दिसून आली. वरोरा स्थानिक कार्यालयात पदाधिकाऱ्यांची गर्दी जमली असून भाजप वरिष्ठ नेत्यांनी पुन्हा एकदा विचार करावा अशी विनंती राजूरकर यांनी पक्षाकडे केली आहे. त्यांची मनधरणी करण्यासाठी भाजपा वरिष्ठ नेते माजी मंत्री हंसराज अहिर (Hansraj Ahir) निवासस्थानी दाखल झाले असून त्यांची मनधरणी करणे सुरू आहे.

तर दुसरीकडे वरोरा विधानसभेमध्ये नेमण्यात आलेले बुधप्रमुख ,शाखाप्रमुख, पदाधिकारी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पक्षाच्या राजीनामा देणार असा इशारा देण्यात आला आहे. राजुरकर यांचा वरोरा विधानसभेत अर्ज दाखल करनार असून सर्व नाराज पदाधिकाऱ्यांच्या गुप्त बैठका सुरू झाल्या आहे. भाजपाचे किंग मेकर माजी मंत्री हंसराज अहिर भाजपाचे पडलेले खिंडार कितपत वाचवू शकतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.

  • सारथी ठाकुर , वरोरा (चंद्रपूर)

You may also like