रामटेक:-नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील देवलापार पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पवनी उडान पुलावर जबलपूर कडून नागपुरकडे जाणाऱ्या भरदाव ट्रकने समोर जात असलेल्या ट्रकला मागेहून जोरदार धडक देऊन झालेल्या शॉर्टसर्किट होऊन ट्रक धो-धो पेटल्याने ट्रकचे मोठे नुकसान झाले असून ट्रकचालकाला गंभीर दुखापत झाली असल्याने नागपूर मेडिकल येथे नेण्यात आले आहे. ही संपूर्ण घटना दि. 8 नोव्हेंबर रोजी पहाटे 5.30 वाजताच्या सुमारास घडली.
माहितीनुसार.नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील जबलपूर कडून नागपूरकडे AP 39 TZ 0648 क्रमांकाचा ट्रक भरदाव वेगाने जात असतांना त्याच मार्गाने समोर जात असलेल्या MP 17 HH 4574 क्रमांकाचा ट्रकला मागेहून जोरदार धडक दिली. यात ट्रकचे केबिन चेंदामेंदा झाले. यातच शॉर्टसर्किट होऊन ट्रकला भीषण आग लागली. तर या अपघातात ट्रकचालक अरुण जयचंद पाल. वय 22 वर्ष. रा. अजने जि.फतेहपूर व क्लीनर दिलीप रामपाल कुमार वय 24 वर्ष.रा. बथवा जि.फतेहपूर हे गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती देवलापार पोलिसांना व ओरिएंटल टोल प्लाझा खुमारी यांना देण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक तुरकुंडे यांनी आपल्या टीमसह घटनास्थळ गाठले. व तात्काळ रामटेक अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. टोल प्लाझा वैद्यकीय अधिकारी डॉ. हनवत यांनी दोन्ही जखमींना नागपूर मेडिकल येथे दाखल केले. तर पेट्रोलिंग टीमचे प्रवीण ठाकूर यांनी घटनास्थळाजवळील स्थिती सांभाळली.
अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण मिळविले.
- पंकज चौधरी ,रामटेक नागपूर.