वर्धा :- वर्धा जिल्ह्यातील (Wardha District) देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्रातून युतीचे उमेदवार राजेश बकाने (Rajesh Bakane) यांच्या विजय होताच प्रत्येक गावागावामध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आला अल्लीपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव सुपारे (Ashokrao Supare) यांचा आठवडी बाजार अल्लीपूर येथे साखर तुला करण्यात आली यावेळी गावातील नागरिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .
देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्रातून राजेश बकाने यांचा विजय झाला त्यानिमित्त माझी पंचायत समिती सदस्य प्रशांत चंदनखेडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोकराव सुपारे यांना मान देऊन त्यांची साखर तुला करण्यात आली .
यावेळी गावातील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नाना ढगे माझी माजी सरपंच माणिक कलोडे सरपंच नितीन चंदनखेडे माजी ग्रामपंचायत सदस्य उत्तम ढगे माझी पंचायत समिती सदस्य प्रशांत चंदनखेडे निखिल कातोरे गणेश चंदनखेडे रोहित कलोडे असंख्य बजरंग दलातील कार्यकर्ते गावातील नागरिक
बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .
गावामध्ये फटाके फोडून मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आला.
- प्रतिनिधी, सतीश काळे, वर्धा