यवतमाळ : काँग्रेस पक्षाच्या वतीने आज जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये सातही विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती माजी मंत्री डॉ. नितीन राऊत जिल्हा निरीक्षक यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या. यानंतर जिल्हा काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषदेला संबोधताना डॉ. नितीन राऊत म्हणाले की प्रत्येक विधानसभेकरिता पाच ते दहा तर काही ठिकाणी वीस ते पंचवीस इच्छुक उमेदवारांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज केलेले आहे. यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर लवकरच निर्णय घेतल्या जाईल तसेच सध्या जिल्ह्यात भेडसावणाऱ्या समस्यांवरही त्यांनी सत्ताधाऱ्यांवर तोंडसुख घेत शेतकरी आत्महत्या जिल्हा म्हणून ओळख झाली आहे.
शेतमालाला भाव मिळत नाही. हमीभाव मात्र 4900 इतका असूनही 3800 ते 4000 रुपये पर्यंत सोयाबीनला योग्य भाव दिल्या जात नाही तसेच शेतकऱ्यांना आवश्यक असलेले सर्व साहित्य घेणे कठीण झाले असून या साहित्यावरही सरकारने जीएसटी लावलेली आहे. पिक विमा कंपन्या अन्यायकारक अटी थोपवत असून शेतकऱ्यांना त्या विम्याचा लाभ दिल्या जात नाही,तसेच जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगारांचीही संख्या दिवसेंदिवस वाढत असून या सुशिक्षित बेरोजगारांना बँकेकडून कर्जही दिल्या जात नाही. जिल्ह्यांमध्ये 950 दलित वस्त्या असून या दलित वस्त्यांमध्ये अद्यापही सुधारणा झालेल्या नाही. या सह जुन्या पेन्शनचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. मागील तीन वर्षात 2256 आत्महत्या आत्तापर्यंत झाल्या असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ही या सरकारने घेतलेल्या नाही,यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यामध्ये रेती तस्करी गांजा तस्करी याच माध्यमातून मोठ्या प्रमाणात वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे यामुळे हे सरकार गरिबाचा वालीच नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले येणाऱ्या निवडणुकांमध्ये तसेच सर्वसामान्यांना शेतकऱ्यांच्या बाजूने बेरोजगारांच्या बाजूने आमचं सरकार राहणार असून गुन्हेगारी थांबविणे हा प्रमुख उद्देश यावेळी आमचा राहणार आहे. यावेळी डाॅ.नितीन राऊत (Nitin Raut) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यवतमाळ जिल्ह्यातही सातही विधानसभेच्या जागा काँग्रेसकडेच राहणार असून या जागेची मागणी केल्या जात आहे.