Home » आमदार रंणजीत कांबळे यांच्या विरोधात पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार

आमदार रंणजीत कांबळे यांच्या विरोधात पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार

भाजप पक्षाचे अध्यक्ष सुनील गफाट यांनी केली तक्रार

by Maha News 7
0 comment
Ranjit Kamble

वर्धा :- वर्धा जिल्ह्यामध्ये सोशल मीडियावर आमदार रंणजीत कांबळे (Ranjit Kamble) यांचा व्हिडिओ व्हायरस झाला आहे त्यामध्ये लाडकी बहीण योजना ही मध्य प्रदेशात मध्ये बंद झाल्याचे वक्तव आमदार रणजीत कांबळे हे करीत असताना दिसत आहे .

वर्धा जिल्ह्याचे भाजप पक्षाचे अध्यक्ष सुनील गफाट (Sunil Gafat) यांनी देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार रंजीत कांबळे यांची तक्रार पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली असून खोट्या दाव्याविरोधात कार्यवाही करण्याची मागणी पत्रा व्दारे केली आहे. यात लिहिली आहे की आमदार रंणजीत कांबळे यांनी सार्वजनिक ठिकाणी खोटे विधान केले असून जनतेमध्ये चुकीची माहिती पसरवली आहे. त्यांनी अशी दावे केली आहे की मध्य प्रदेशात राज्यात लागू असलेली लाडकी बहीण योजना बंद करण्यात आली आहे हा दावा पूर्णपणे खोटा असून अशा खोट्या माहितीच्या आधारे जनतेमध्ये गैरसमज पसरवितो आणि लोकांना दिशाभूल करणे हा अत्यंत गंभीर व निंदनीय प्रकार आहे .

Sunil Gufat

या केलेल्या खोट्या विधानाबाबत तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे .देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राच्या एका गावामध्ये सार्वजनिक ठिकाणी आमदार रणजीत कांबळे यांनी उपस्थित महिला व नागरिकांनी त्यांना प्रश्न विचारले असता त्यांनी असे उत्तर दिले हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यामुळे भाजप पक्षाचे अध्यक्ष सुनील गफाट यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे .

  • प्रतिनिधी,  सतीश काळे, वर्धा

You may also like