नंदूरबार :- धडगाव अक्कलकुवा विधानसभा मधील अपक्ष उमेदवार साया वसावे व त्याच्या कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेचे नंदुरबार व धुळे जिल्ह्या संपर्क प्रमुख माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांना काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे धडगाव येथे जाहीर सभेसाठी आले होते त्यावेळी संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी हे देखील धडगाव येथे आले होते यावेळी त्यांना काळे झेंडे दाखवून विरोध करण्यात आला .माजी आमदार व जिल्ह्याचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी गेल्या महिन्यात शिंदे सेनेच्या मेळाव्यात आदिवासी नेते पद्माकर वळवी यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही असे वक्तव्य केले होते. यावरून आदिवासी समाजांमध्ये तीव्र विरोध निर्माण होऊन त्यावेळी चंद्रकांत रघुवंशी याच्या विरोधात आदिवासी संघटना आक्रमक झाल्या होत्या. आज चंद्रकांत रघुवंशी धडगाव येथे आले असता विविध आदिवासी संघटनेंकडून काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध करण्यात आला .चंद्रकांत रघुवंशी यांनी आदिवासी समाजाची माफी मागावी अन्यथा त्यांना जिल्ह्यात फिरु देणार नाही असे यावेळी सांगण्यात आले.
- नंदूरबार जिल्हा प्रतिनिधी मिर्झा आफिक