Home » चांदिवलीतुन नसीम खान यांनी दाखल केला नामांकन

चांदिवलीतुन नसीम खान यांनी दाखल केला नामांकन

अर्ज दाखल करताना उसळला जनसागर

by Maha News 7
0 comment

मुंबई :- काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष मो. आरिफ (नसीम) खान (Naseem Khan) यांनी चांदिवली विधानसभा मतदार संघातून (Chandivali Assembly Constituency) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) काँग्रेस उमेदवार म्हणून  नामांकन अर्ज दाखल केला. सकाळी ठीक 10 वाजता साकीनाका मेट्रो स्टेशन पासून 90 फूट रोड, काजूपाडा पाईपलाईन मार्गे एलबीएस रोड करीत विद्याविहार  येथील 168 निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात त्यांनी आज त्यांचे नामांकन अर्ज दाखल केला. साकीनाका ते विद्याविहार निवडणूक कार्यालयापर्यंत सुमारे 8 ते 10 हजार लोकांचा जणू जनसागरच उसळुन आला होता. जागोजागी महिलांनी त्यांची आरती ओवाळून त्यांना निवडणुकीत विजयी होण्याच्या आशीर्वाद दिल्या तसेच ठिक-ठिकाणी पुष्प वर्षा व पुष्पमाला घालीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी काँग्रेसचे आमदार भाई जगताप, माजी मंत्री सुरेश शेट्टी, मुंबई काँग्रेस कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, शिवसेना (उबाठ) गटाचे विजू शिंदे, सोमनाथ सांगळे, एस अण्णामलाई, बालाजी सांगळे, सनी आचरेकर, प्रशांत नलगे, हिरालाल यादव, बालकृष्ण गटे, मयूर राठोड, उमाकांत भांगिरे, प्रशांत मोरे, चंदन सावंत, साईनाथ कटके राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे मुंबई सरचिटणीस बाबू बत्तेली, तालुका अध्यक्ष अबू स्वालेहा, रत्नाकर शेट्टी, व्यासदेव पवार, चेतन जाधव, फरमान राईन, शांताराम मोरे, आरिफ शेख, राजेंद्र ढवळे, महिला तालुका अध्यक्षा छाया मयेकर यांच्यासह समाजवादी पक्षाचे तसेच व इतर पक्षाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

  • प्रतिनिधी-गोवर्धन बिहाडे

ही बातमी पण वाचा : सावनेर विधानसभा क्षेत्र श्री क्षेत्र आदासा येथे आशिष देशमुख यांची सदिच्छ भेट

You may also like